मी संजय शांताराम परब आणि माझ्या सोबत कार्यरत असणारे konkandirect.com
ग्रुपमधील माझे सहकारी व मित्र परिवाराकडून आपले हार्दिक स्वागत.
कोकण विषयक अनेक विषयात चर्चा करून योग्य माहिती संकलीत करून संपूर्ण जगाला कोकणची इत्यंभूत माहिती पुरवणे आणि जगाला कोकणात आणण्याचे सर्वांसाठी खुले असणारे भव्य आणि कल्पक व्यासपीठ म्हणजेच konkandirect.com.
कोकण पर्यटन, कृषी, शैक्षणिक उपक्रम, रोजगार, विकासाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, कला, संस्कृती, adventure, आरोग्य, व्यवसाय, फळप्रक्रिया, मत्स्यप्रक्रिया, सामाजिक कार्य वगैरे अनेक विषय
konkandirect.com
मध्ये आहेत. आपल्या पैकी अनेक जण यामधील विविध विषयात स्वतःला जमेल तसे कार्य करीत आहेत. म्हणूनच आम्हाला तुमच्यासोबत जोडून घ्यायचे आहे. तुम्हाला संपूर्ण कोकणासाठी जोडण्याचा एक लहानसा प्रयत्न आम्ही konkandirect.com
च्या माध्यमातून करीत आहोत. तुमच्या नावासहित तुमच्याकडे असणारी कोकण विषयक सर्व माहिती आम्हाला द्या. आम्ही ती पोर्टलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवू.
आम्ही स्वतः जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स व मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतले आहे. गेली १५ ते २० वर्षे कोकणचा खूप जवळून अभ्यास करीत आहोत. आज आपल्या नव्या सरकारचे नवे धोरण म्हणजेच डीजीटल महाराष्ट्र. या डीजीटल महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. या डीजीटल महाराष्ट्रात कोकण कुठेही मागे पडू नये म्हणून आम्ही संपूर्ण कोकणाला डीजीटल बनवण्याचे कार्य सुरु केले आहे.
पुढील १०० वर्षांचे व्हिजन ठेवून आपण सर्वांनी कोकण विकासाची रचना करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. आता नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करूया.
कोकणात सर्व काही आहे. आपल्याला त्यांचा योग्य दर्जा वाढवून काम करायचे आहे. म्हणूनच konkandirect.com
च्या माध्यमातून आपण कोकणचे दर्जेदार नियोजन करूया. आपल्या नियोजनाला शासनाची जोड देऊया. प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य माणसे व योग्य आर्थिक नियोजन हे लागतेच. आम्ही डीजीटल कोकणचे कार्य प्रत्यक्षात उतरविण्यास सुरुवात केली आहे. तुमचे आशीर्वाद व सर्वतोपरी मदत या उपक्रमाला मिळावी म्हणून आपणास विनम्र अभिवादन करीत आहोत.
एकमेकां सहाय्य करू, konkandirect.com
मध्ये एकत्र येऊ.
आपले,
संजय शांताराम परब
Friends,
I, Sanjay Shantaram Parab and my colleagues working with me in our Konkan Group welcome you to our website konkandirect.com
This site is a big and creative platform to provide accurate and detailed information about Konkan to people all over the world.
In this site we have covered various aspects like History, Geography, Socio-Culture, Arts, Agriculture, Social Activities, Adventure Sports, Food Processing etc. Many people among you are actively working in the above mentioned fields. We intend to connect with you and this site is our sincere attempt for the same. We request you to provide Konkan related information you have along with your name and contact details. We will publish that information online on our site for the benefit of all.
Our group consists of people who are professionals from JJ School of Arts and Business Management. We have put in efforts for the past 20 years in studying Konkan and its development. Today's government lays emphasis on Digital Maharashtra. To bring this dream into reality is each one of ours responsibility. We have taken up this initiative to put Konkan on the digital platform.
We need to come together and plan for Konkan Development which will be sustainable. It's time to act now!
Konkan is blessed with everything. We need to raise its standard. Through konkandirect.com let us do quality planning for Konkan Development and get governments support for our plans. To bring any concept into reality finance and well qualified people are a must. We have taken the 1st step towards Digital Konkan. It is our humble request to you to bless us and help us in all possible ways.
Let's help each other, let's be a part of director@konkandirect.com